एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल कि मी कश्याबद्दल बोलत आहे. सध्या क्रिकेटने सगळ्यांना झपाटले आहे. पुलंच्या भाषेत सांगायचे तर क्रिकेट हा खेळायचा विषय नसून बोलायचा विषय आहे आणि त्याला कोणीही अपवाद नाहीये. मग तो धोनीने शेवटची ओवर कोणाला द्यायला हवी होती हे असो कि पुढच्या सामन्यासाठी अश्विन बरा कि भज्जी.
ह्यात आमच्याकडे काही विशेष वेगळी परिस्थिती नाही. फक्त क्रिकेटचे चाहते बदलले आहेत इतकेच. आणि ह्यात भर पडली आहे भार्गवची. मला सगळ्यात कमाल वाटते ती त्याच्या चिकाटीची. इंग्लंडहून काकाचा फोन असुदे, सहकारनगरहून त्याच्या लाडक्या बहिणीचा किंवा ठाण्याहून अद्वैतदादाचा... ह्याचा बोलण्याचा विषय एकच. गेल्या दोन दिवसांमधले सामने, त्यात पडलेल्या विकेट्स आणि झालेले विक्रम.
मजा चालू आहे थोडक्यात ह्या क्रिकेटज्वराने. आणि पुढच्या काही दिवसात हे जास्त होणार आहे कारण आता सुरु होतील बाद फेरीचे सामने.
आणि हा विश्वकरंडक संपला कि मग आहे IPL ..... मग काय चालू दे हे असेच. उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल आहे.... :-)

No comments:
Post a Comment