खूप दिवसांनी बघितला माझा ब्लॉग. शेवटचा मी लिहिला तो भारत पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना झाल्यावर. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले त्यानंतर. भारत अतिशय वाईट रीतीने इंग्लंडशी कसोटी आणि एक दिवसीय सामने हरला, नंतर स्वगृही वेस्टइंडीजला हरवत आहे, डॉलर रुपयाच्या तुलनेत वधारला आणि बरेच काही. आमच्या परदेशी मित्रांना आनंद झाला कारण त्यांना त्यांच्या परदेशी चलनाचे भारतीय रुपये आता थोडे जास्त मिळतील. असो. ज्याचा त्याचा प्रश्न....
आम्हाला मात्र वेगळेच प्रश्न पडत आहेत. मायकेल शुमाकर आणि आता किमी रायकिनन फॉर्मुला-१ मध्ये परत का बरं आला. आमच्या काही मित्रांना प्रश्न पडतात कि सचिन अजून निवृत्ती का बरं जाहीर करत नाही? आता हे त्यांचे त्यांना माहिती. आपण आपल्याला वाटले तर बघायचे नाहीतर आपल्या हातात दूरचित्रवाणीचा रिमोट आहेच.
बरं दूरचित्रवाणीशिवाय मी इतर काही करतो का सध्या? होतर. थोडेसे वाचन चालू आहे. आणि खरच थोडेसे. मला कधीकधी खूप अपराधी वाटते माझी वाचनाची सवय कमी झाल्याबद्दल. बघू परत थोडे प्रयत्न चालू आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तके विकत घेणे. बहुधा एक वर्ष होऊन गेले मला पुस्तके विकत घेतल्याला. ह्या निमित्ताने आठवण झाली आहे तर वर्षाअखेर थोडी विकत घेईन म्हणतोय. ह्या वर्षात वाचलेले चांगले पुस्तक म्हणजे हसरे दुख. हे पुस्तक म्हणजे चार्ली चाप्लीनचे चरित्र आहे. जरूर वाचा तुम्हाला आवड असल्यास.

No comments:
Post a Comment