Wednesday, 15 February 2012

२०१२ आणि हा माझा पहिला ब्लॉग. कारण काहीच नाही. 

गेले काही दिवस सर्वत्र महापालिकेच्या निवडणुकांचे घुमशान चालू आहे. पण आपण खरच लोकशाही मध्ये राहतो का? एक उमेदवार ह्या प्रचाराचा धुराला उडवत आमच्या घरी एक पत्रक देऊन गेला. तो गेल्यावर मी त्यातील मजकूर वाचला. त्यात ते पुढील ५ वर्षात एकही ठोस काम नाही प्रत्येक नोंद समाजोपयोगी कामे वगैरे असेच... आता ५ वर्षांनी त्याचा ताळेबंद कसा मागणार. काहीच ठोस नाही.

त्यातच एक बातमी वाचली. सरकारी नोकरांचा १५ वर्षांनी एकदा आढावा घेणार. हरे राम...इथे खासगी कंपन्या मध्ये आम्ही दर वर्षी हा वेडेपणा करतो.. कशासाठी???


मध्यंतरी प्रत्येक चौकामध्ये "मी अण्णा" दिसत होते. त्यातले निम्मे रस्त्यावर उलट दिशेने, एका दुचाकीवरून ३ जण जात होते. हे म्हणे भ्रष्टाचार संपवणार.. वाहतूक नियंत्रक दिवा हिरवा होण्याआधी गाडी दामटणार हे लोक...

असो उद्या आम्ही आमचे मतदानाचे "पवित्र" कर्तव्य बजावणार. म्हणजे उडदामाजी काळे गोरे शोधणार इतकेच. सध्या तरी तेवढेच आपल्या हातात आहे.

No comments:

Post a Comment