Thursday, 22 February 2018

असंच काहीतरी

सहज बुकमार्क बघताना आपण काही ब्लॉग लिहिले आहेत हे लक्षात आले.  शेवटचा २०१३ ला.. ५ वर्ष झाली. काही दिवसापूर्वी कुठेतरी ब्लॉगर्सची स्पर्धा घेतलेली बघितली तेव्हा एकदा वाटलं होते पण आज हाती पेन (किंवा कीबोर्ड घेतला). 

सध्या मनातलं ट्विटर किंवा व्हाट्सअँप वर चालूच असते. पण कालचा विषय तसे विशेष होता. BMCC च्या मैदानावर शनिवारवाड्याचा सेट उभारून दादा साहेबांची मुलाखत घेणार. दोन तीन दिवस सगळीकडे माहोल बनवला. पण खरं सांगू?  इतकी भारी नाही झाली. राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे साहेब तेल लावलेले पैलवान आहेत. राज कितीही भारी असले तरी त्यांनी कुठेच साहेबांची कोंडी केली नाही. आणि एकंदर सगळ्या राजकारण्यांचा इतिहास बघता ते जाहीर कार्यक्रमात करणार पण नाही. साहेबांचे दिल्लीच्या सिंहासनाची इच्छा सर्वांना माहित आहे त्यामुळे रॅपिड फायर मधला महाराष्ट्र कि दिल्ली हा प्रश्न गैरलागू होता उत्तर निश्चित होते. उद्धव कि राज, उत्तर ठाकरे परिवार.

प्रगट मुलाखतीआधीचे भाषण एका पक्षप्रमुखाचे आहे हे अगदी सहज कळत होते. अर्थात आता जशी जाहिरात करतात तितके सामान्य होईल अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती. त्यात पक्षांवरून थोडी खेचाखेची झाली अर्थात त्यावेळी शहराचे पालक मंत्री घरच्या (खरंच) कार्यात गुंतले होते त्यामुळे इथे घ्या बोलून. नंतर आहोतच आपण सगळे :-)  

जशी मुलाखत संपली तसे व्हाट्सअँपवर त्यावरचे विनोद चालू पण झाले. कमाल डोकी चालतात लोकांची. 

असो बघा ही मुलाखत जर तुमची चुकली असेल तर. मात्र त्यात भावनिक गुंतू नका बरं का? मी ह्यांना एकत्र स्टेजवर बघितले वगैरे :-)

No comments:

Post a Comment